आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशनच्या वतीने अतिरिक्त आयुक्तांना निवेदन
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील राज चेंबर, फलटण पोलीस चौकी येथील चौकाला भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचे नाव देण्याची मागणी आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले.
सदर नामकरणाचा ठराव होण्यासाठी, हा विषय महापालिकेतील सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेण्याचे देखील स्पष्ट करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे साहेबान जहागीरदार, नगरसेवक समद खान, खान बाबा, फारूक शेख, मुजाहिद सय्यद, हाजी वहाब सय्यद, खालिद शेख, सय्यद अमीर, समीर खान, नावेद शेख, मोहसीन शेख, शम्स खान, दानिश शेख, मुफ्ती अल्ताफ, हाजी शहेबाज, शाहबाज बॉक्सर, तन्वीर पठाण, शाकिर शेख, शाहनवाज शेख, अकरम शेख, अजीम राजे, भैय्या पठाण, अल्तमश जरीवाला, फरीद सय्यद, शेरू भाई , फैरोज पठाण, इमरान शेख, गुलाम शेख, लतीफ खान, अयान खान, रेहान खान, फैजान शेख, मीजान कुरैशी, हनजला खान, हुजैफ खान, फरहान शेख, शोएब शेख, रंगरेज अमिनोद्दीन, अजर शेख आदी उपस्थित होते.

भारताचे पहिले शिक्षणमंत्री तथा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले आहे. लोकजागृती करण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांविरोधात वृत्तपत्रातून लेखन करुन स्वातंत्र्यसंग्रामाच्या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झाले होते.
भारतरत्न मौलाना आझाद यांचे अहमदनगर शहराशी एक वेगळे भावनिक नाते जोडले गेले आहे. ब्रिटिशांनी त्यांना शहरातील भुईकोट किल्ल्यात काही वर्ष कैदेत ठेवले होते. कैदेत असताना त्यांनी घुबर ए खातीर हे पुस्तक लिहिले. तर स्वातंत्र्यानंतर ते देशाचे शिक्षण मंत्री राहिले. एवढ्या मोठ्या स्वातंत्र्य संग्रामातील राष्ट्रीय नेत्याचे वास्तव्य शहराशी जोडले गेले असून, शहरातील राज चेंबर, फलटण पोलीस चौकी येथील चौकाला भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचे नाव देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच मंगलगेट ते राज चेंबर येथील रस्त्याच्या कडेला सुफी संत सय्यद फाजल शाह वली रहे. (बापूसाहब) यांची दर्गा आहे. ही दर्गा सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान आहे. विविध धर्माचे भाविक दर्शनाला येथे येत असतात. या दर्गाकडे जाणाऱ्या रस्त्याला सुफी संत सय्यद फाजल शाह वली रहे. (बापूसाहब) मार्ग नामकरण करण्याचे शिष्टमंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
राज चेंबर, फलटण पोलीस चौकी येथे असलेल्या चौकाला कोणतेही नाव नाही. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचे या शहराशी वेगळे नाते आहे. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या लढ्याप्रसंगी ब्रिटिशांनी त्यांना शहरातील भुईकोट किल्ल्यात बंदीवान म्हणून ठेवले होते. भुईकोट किल्ल्याच्या काही अंतरावर असलेल्या या चौकाला त्यांचे नाव दिल्यास त्यांच्या योगदानाला खऱ्या अर्थाने अभिवादन ठरणार आहे. -साहेबान जहागीरदार (संस्थापक अध्यक्ष, आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशन)
