सभासदांच्या हितासाठी कानडे यांचे कार्य दिशादर्शक ठरणार -योगेश सोनवणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी, टिव्ही सेंटर येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे सल्लागार किशोर कानडे यांची महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे पै. योगेश सोनवणे, दत्तात्रय साबळे, गोरख तनपुरे, द्वारकादास किंगर, लहारे काका, गोवर्धन जाधव, बापूसाहेब बेल्हेकर, आदिनाथ उपलांची, बंडू इवळे, दत्ता फटांगरे, अर्जून जाधव, वीरेंद्र पंडित, धनंजय कुलकर्णी, प्रकाश सोनवणे, घावटे मामा, रुक्मिणी कानडे, शितल कानडे, अनिता संस्कर, आशा महाजन, शितल पंडित, मनीषा साबळे, ज्योती फटांगरे, सारिका तनपुरे, पल्लवी दरंदले, हुच्चे काकू आदींसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
योगेश सोनवणे म्हणाले की, सामाजिक कार्य करण्याची तळमळ असलेले किशोर कानडे विविध क्षेत्रात निस्वार्थपणे योगदान देत आहेत. विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी युवकांना एकत्र करुन उत्तमपणे कार्य चालवलेले आहे. त्यांची चेअरमनपदी झालेली निवड ही प्रतिष्ठानच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. कानडे यांच्या नेतृत्वाने पतसंस्थेची विकासात्मक दिशेने वाटचाल करणार आहे. सभासदांना अधिक लाभ होण्याच्या दृष्टीकोनाने त्यांचे कार्य दिशादर्शक ठरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना किशोर कानडे यांनी कुटुंबातील सदस्यांकडून झालेला सत्कार आनखी चांगले कार्य करण्यास ऊर्जा देणार आहे. सभासद हिताला प्राधान्य देऊन कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
