• Mon. Jan 12th, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

ByMirror

Oct 2, 2023

इतरांसाठी जगणारी माणसे अजरामर ठरतात -प्रा. माणिक विधाते

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर वाडियापार्क येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासही अभिवादन करण्यात आले.


आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अभिवादन कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, ओबीसी बारा बुलतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली (मामा) गायकवाड, बाळासाहेब भुजबळ, विशाल बेलपवार, राजेंद्र पडोळे, भाऊसाहेब कोल्हे, सुरेश चुटके, शैलेश धोकटे, जालिंदर बोरुडे, बनकर सर, बाळासाहेब इवळे, अनिल इवळे, कैलास खंदारे, संतोष माळवदे, सुनिल सकट, कृष्णा तवले, अमोल चव्हाण, उमरेडकर सर, निलेश शिंदे, शिवशंकर पाटील आदी उपस्थित होते.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने उलथवून लावली. सत्य व अहिंसेच्या मार्गाने जग जिंकता येते, हे महात्मा गांधीच्या कार्यातून सिध्द झाले. इतरांसाठी जगणारी माणसे अजरामर ठरतात. स्वतंत्र्य भारताच्या जडणघडणीमध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेले योगदान न विसरता येणारे आहे. तर सार्वजनिक स्वच्छता आरोग्यासाठी महत्त्वाची असून, साथीच्या आजारांना टाळण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे व स्वच्छता हीच सेवा ही मोहिम व्यापक करण्यासाठी सर्वांना योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *