माहिती अधिकारी अमोल महाजन यांच्याकडून डोंगरे संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक
अहमदनगर (प्रतिनिधी)- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर विभागाच्या वतीने राष्ट्रीय पोषण माह व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य (भरड धान्य) वर्ष 2023 निमित्त शहरात झालेल्या मल्टिमिडिया चित्र प्रदर्शनात सहभाग नोंदविल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे माहिती अधिकारी अमोल महाजन यांच्या हस्ते डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक प्रसिध्दी अधिकारी पी. कुमार, सुरेश खामकर उपस्थित होते.
आजारांना दूर ठेवणाऱ्या पौष्टीक धान्य आणि त्या धान्यांपासून तयार करण्यात आलेल्या चविष्ट पदार्थांसह सकस आहारांची माहिती, छायाचित्र आणि चित्रफितींच्या (व्हीडीओ) माध्यमातून प्रदर्शनाद्वारे जनजागृती करण्यात आली. या अभियानात डोंगरे यांनी सक्रीय सहभाग नोंदवून ग्रामीण भागात या संदर्भात जागृती करण्याचा संकल्प केला. अमोल महाजन यांनी डोंगरे संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
