अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी तय्यब बेग यांची नियुक्ती करण्यात आली. अल्पसंख्यांक समाजात असलेला जनसंपर्क व त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून बेग यांच्याकडे अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांची बेग यांच्या नियुक्तीची घोषणा केली. भिंगार येथील तय्यब बेग 19 वर्ष इंडियन आर्मी मेडिकल कोरमधून देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्य सुरु केले. ते माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत होते. सामाजिक कार्यातून ते भाजप पक्षाला जोडले गेले. त्यांनी भाजप सैनिक आघाडीचे नगर तालुका अध्यक्ष व जिल्हा सचिवपद देखील सांभाळले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून पक्ष श्रेष्ठींनी त्यांची नियुक्ती केली आहे. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अल्पसंख्याक सहसंयोजक व विधानसभा निवडणुकीसाठी राहुरी तालुक्याच्या संयोजकपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल त्यांचे भाजप पंचायत राज व ग्रामविकास विभागचे प्रदेश उपाध्यक्ष वैशाली नागरे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख रोहिदास धुमाळ पाटील, बबनराव शेळके, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय कदम, जिल्हाध्यक्ष केशव कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष अंबादास शेळके, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, दीपक कार्ले, ओबीसी जिल्हा सरचिटणीस संतोष म्हस्के, आदिवासी आध्यक्ष पाराजी आगलावे यांनी अभिनंदन केले आहे.
