भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे गायकवाड यांची गृहमंत्रीकडे तक्रार
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील कुख्यात गुंड व त्याच्या टोळीवर हद्दपार किंवा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
गायकवाड यांनी गृहमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नागापूर येथील त्या कुख्यात गुंडावर पोलीस स्टेशनला मुलींची छेडछाड व महिलांचा विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर जागेवर ताबा मारणे, अपहरण व खूनाचा प्रयत्न यांसारख्या अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहे. त्याची गावांमध्ये दहशत असल्याने जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर व्यक्तीने टोळी तयार केली असून. या टोळी मार्फत तो गुन्हे करत आहे. त्याला हद्दपार करावे किंवा मोक्कातंर्गत कारवाई करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.
