• Sat. Nov 1st, 2025

महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनची कार्यकारणी जाहीर

ByMirror

Sep 19, 2023

जिल्हाध्यक्षपदी विठ्ठलराव माळी तर सचिवपदी कॉ. संजय नांगरे यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनची जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी विठ्ठलराव माळी तर सचिवपदी कॉ. संजय नांगरे यांची एकमताने निवड करण्यात आली.


युनियनचे अधिवेशन येथे राज्य उपाध्यक्ष कॉ.डॉ. राम बाहेती, भाकपचे राज्यसचिव कॉ. सुभाष लांडे, जिल्हा सचिव कॉ. बन्सी सातपुते,कॉ श्रीधर आदिक कॉ सुरेश पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या अधिवेशनात कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पुढील तीन वर्षासाठी पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.


युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी लता मेंगाळ, किसनराव गंभीरे, सहसेक्रेटरीपदी विलास मिसाळ, खजिनदार पदी कॉ.अशोक डुबे यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारणी सदस्यपदी ज्ञानेश्‍वर भंगड, शोभा शिंदे, श्‍याम मोरे, नंदु उमाप, चंद्रकांत माळी, मारूती सावंत, संजय डमाळ, जिजाबाई बर्डे, सुनिल उमाप, सुरेश बागुल, बाळासाहेब बर्डे, नंदाबाई काळे, पोपट भुतांबरे, सुधाकर तारडे, हरी माळी, सोमनाथ बर्डे, सुलोचना खेंगट यांची निवड करण्यात आली आहे. कॉ. सुरेश पानसरे व कॉ. श्रीधर आदिक कायम निमंत्रित असणार आहे.


या अधिवेशनात शेतमजूर, भूमीहीन कष्टकरी वर्गाच्या मागण्यांचे विविध ठराव करण्यात आले असून, ठरावातील मागण्यांसाठी 30 आक्टोबर रोजी प्रांताधिकारी श्रीरामपूर यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *