• Sun. Nov 2nd, 2025

पोस्टल सोसायटीच्या चेअरमनपदी ॲड. रामेश्‍वर ढाकणे

ByMirror

Sep 12, 2023

तर व्हाईस चेअरमनपदी सुनिल कुलकर्णी यांची निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर पोस्टल डिव्हीजन सोसायटीच्या नुकतेच पार पाडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत चेअरमनपदी ॲड. रामेश्‍वर ढाकणे तर व्हाईस चेअरमनपदी सुनिल कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सभेत चेअरमन पदासाठी ॲड. ढाकणे यांच्या नावाची सूचना माजी चेअरमन निसार शेख यांनी मांडली. त्यास प्रमोद कदम यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी सुनील कुलकर्णी यांच्या नावाची सुचना प्रफुल्लकुमार काळे यांनी मांडली. त्याला अनुमोदन महेश तामटे यांनी दिले. यानुसार दोन्ही पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच संस्थेच्या सेक्रेटरीपदी प्रफुल्ल कुमार काळे यांची फेरनिवड करण्यात आली.


यावेळी ॲड. ढाकणे म्हणाले की, अहदमनगर पोस्टल डिव्हीजन को ऑप क्रेडीट सोसायटी ही राज्य कार्यक्षेत्र असलेली 103 वर्ष जुनी सोसयटी असून, याव्दारे पोस्टल कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी, घरबांधण्यासाठी 25 लाख रुपये कर्ज देते. कर्जाची वसुली पगारातून नियमीतपणे होत असल्यामुळे संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालली आहे. संस्थेने आपला ऑडिट अ वर्ग कायम राखला आहे. यापुढेही संस्थेची यशस्वी घौडदौड कायम ठेवली जाईल याची ग्वाही त्यांनी दिली.


यावेळी संस्थेचे संचालक निसार शेख, महेश तामटे, प्रमोद कदम, प्रफुल्लकुमार काळे, किशोर नेमाने, शिवाजी कांबळे, सलीम शेख, अमीत कोरडे, बळी जायभाय, अरविंद वालझाडे, सचिन देवकाते, गणेश केसकर, सचिन अस्वर, सुखदेव पालवे, सुनील भागवत, विजय चाबुकस्वार, सतीश येवले, शरद नवसुपे, देविदास गोरे, महेश क्षीरसागर, अजय आगळे, राजेंद्र गवते, भिमराज गिरमकर, संजय परभाणे, संजय लंके, लक्ष्मण बर्डे, रि.एस.एस.पी. आर.ए. धस, सीमा भालेराव, अर्चना गोसके, जया मडावी, सपना चिल्वर, दत्तात्रय जासूद, प्रताप कारखीले, अर्जुन जटाले, सुभाष चव्हाण आदींसह सभासद मोठया संख्यने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद कदम यांनी मानले. आभार सेक्रेटरी प्रफुल्लकुमार काळे यांनी मानले.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी………………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *