विद्या कॉलनीतील नळाचे कनेक्शन तात्काळ पूर्ववत जोडून देण्याच्या केल्या सूचना
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड येथील विद्या कॉलनीत पाण्याचे संकट ओढवलेल्या नागरिकांसाठी नगरसेवक अनिल शिंदे धावून आले. शिंदे यांनी नागरिकांची भेट घेवून पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी संबंधित ठेकेदाराला नळाचे कनेक्शन पूर्ववत जोडून देण्याच्या सूचना केल्या.

विद्या कॉलनीत नुकतेच रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी रस्ता खोदण्यात आला. रस्ता खोदला जात असताना ठेकेदाराच्या चूकीमुळे नागरिकांच्या पाण्याच्या पाईपलाइनचे कनेक्शन देखील तुटले. यामुळे नागरिकांच्या नळाला पाणी येत नसल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली. तर रस्ता पूर्णत: खोदल्याने व त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने टँकरने देखील नागरिकांना पाणी पुरविण्यास अडचण निर्माण झाली आहे.
ठेकेदार नळाचे कनेक्शन दुरुस्त करत नसल्याने व टँकर येण्यास देखील अडचण निर्माण झाल्याने या परिसरात पाणीबाणीचे संकट उभे ठाकले होते. नागरिकांनी नगरसेवक अनिल शिंदे यांच्याशी संपर्क केला. शिंदे यांनी तातडीने ठेकेदाराला बोलावून नागरिकांच्या नळाचे कनेक्शन पूर्ववत जोडून देण्याच्या सूचना केल्या.
गभीर बनलेल्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने दखल घेतल्याबद्दल नागरिकांनी शिंदे यांचे आभार मानले. यावेळी दत्ता गाडळकर, आशिष (मुन्ना) शिंदे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओंकार शिंदे आदींसह परिसरातील महिला उपस्थित होत्या.