जिल्हा आढावा बैठकीत भविष्यातील निवडणुका व संघटनेच्या वाटचालिवर चर्चा
बहुजन समाजाला एकजुट करुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात संघटनेने अस्तित्व निर्माण केले -अशोक शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- फुले शाहू आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचाची जिल्हा आढावा बैठक शहरात पार पडली. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत भविष्यातील निवडणुका व संघटनेची वाटचाल या विषयावर चर्चा करण्यात आली. तर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
सतीश मगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष सुनील सकट, राज्य महिलाध्यक्षा उषाताई शिंदे, महिला विकास सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा कविता नेटके, सामाजिक कार्यकर्त्या राजश्रीताई ससाणे, बाळासाहेब नेटके, पोषाण्णा कडमिंचे,तनशीफ शेख शहराध्यक्ष युनूस पठाण आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोक शिंदे म्हणाले की, बहुजन समाजाला एकजुट करुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात संघटनेने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. वंचित समाजाला फक्त वोट बँक म्हणून पाहणाऱ्या राजकीय पक्षाला देखील भविष्यातील निवडणुकांमध्ये धडा शिकवला जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. सतीश मगर यांनी दुर्लक्षीत घटकांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी करावे. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटल्यास हा वर्ग संघटनेला जोडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात प्रदेश कार्याध्यक्ष सुनील सकट यांनी संघटनेचे विचार व कार्याची माहिती दिली. या बैठकीत शहर कार्याध्यक्षपदी संदीप पखाले, उपाध्यक्षपदी अल्लाउद्दीन (भैय्या) पठाण, सरचिटणीसपदी अतुल वाघ, युवक शहराध्यक्षपदी किरण जाधव, दक्षिण (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी प्रदिप ससाणे, उत्तर जिल्हाध्यक्षपदी बाबा सय्यद, जिल्हा उपाध्यक्षपदी विशाल केदारी, पाथर्डी महिला तालुकाध्यक्षपदी शबाना शेख, बीड जिल्हा युवक अध्यक्षपदी सुनील चव्हाण यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देवून त्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणारे पै. दिपक उमाप व त्यांचे प्रशिक्षक सनी निर्मल तसेच जहीर सय्यद यांचा संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.