मागासवर्गीय व बहुजन समाज त्यांच्या पाठिशी एकवटणार असल्याचा दावा
अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीयांचे सक्षमपणे नेतृत्व करुन त्यांना न्याय देण्याचे काम करणारे माजी मंत्री बबनराव घोलप उर्फ नाना यांनी अहमदनगरच्या शिर्डी लोकसभा (उत्तर) मतदारसंघातून उमेदवारी करावी त्यांच्या पाठिशी सर्व मागासवर्गीय व बहुजन समाज एकवटणार असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख रघुनाथ आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
माजी मंत्री बबनराव घोलप तळागाळातील कार्यकर्त्यांना ज्ञात आहे. त्यांच्या कामाचा प्रगल्भ अनुभव आणि सामाजिक बांधिलकीने त्यांनी केलेल्या कार्याला सर्व बहुजन समाज साक्षीदार आहे. मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजातील प्रश्न दिवसंदिवस बिकट होत असताना त्यांनी पुन्हा नेतृत्व करण्यासाठी शिर्डी लोकसभेची उमेदवारी करण्याचे आंबेडकर यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.
घोलप यांनी कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी करावी त्यांच्या पाठिशी समाज उभा राहणार आहे. उत्तरेत सक्षम खासदार न मिळाल्याने सर्वसामान्यांचा विकास खुंटला आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचा वैचारिक वारसा ते पुढे चालवित असल्याने वंचित समाजाला न्याय मिळणार आहे. राजकारणाच्या पेचात त्यांना राजकीय पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास त्यांनी अपक्ष उमेदवारी लढवावी. हक्काचा माणुस मिळाल्याने जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.