• Thu. Oct 16th, 2025

संजय नगर झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते चकाकणार

ByMirror

Aug 30, 2023

रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

विरोधकांच्या अपप्रचाराला कामाच्या माध्यमातून उत्तर देणार -नगरसेवक अनिल शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- सुरुवातीला नगरसेवक होण्यासाठी संजय नगर परिसरातील नागरिकांनी मोठा विश्‍वास टाकला. हा परिसर माझ्या प्रभागातील बालेकिल्ला आहे. येथील नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम सातत्याने करण्यात आले आहे. येथील महत्त्वाचा पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाईन व रस्त्याचा प्रश्‍न सोडविण्यात आला आहे. पथदिव्यांची व्यवस्था करुन परिसरातील अंधकार देखील दूर केला जाणार असल्याचे आश्‍वासन नगरसेवक अनिल शिंदे यांनी दिले. तर काही विरोधक अपप्रचार करत आहे, या अपप्रचाराला कामाच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.


काटवन खंडोबा, संजय नगर झोपडपट्टीमधील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाच्या शुभारंभाप्रसंगी नगरसेवक शिंदे बोलत होते. यावेळी दत्ता गाडळकर, आशिष (मुन्ना) शिंदे, विशाल कांबळे, विजय काळोखे, लियाकत पठाण, आम्मू शेख, शिवाजी जावळे, शंकर भडांगे, श्‍याम घोगरे, शंकर पंडित, सतीश कांबळे, आझाद शिंदे, शरीफा पठाण, अलका पंडित, शकुंतला आरडे, सुनिता नायडू, मंगल आढाव, आशा काळोखे, कृष्णाबाई धाडगे, सुनिता जावळे, रेखा आल्हाट, वनिता पंडित, युवराजसिंग जुनी, मिलनसिंग जुनी, सागरसिंग जुनी, बरसातसिंग बावरी, सोनूसिंग जुनी, रेणुका आढाव आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


दत्ता गाडळकर म्हणाले की, संजय नगर झोपडपट्टी भागातील महत्त्वाचे प्रश्‍न नगरसेवक अनिल शिंदे यांनी मार्गी लावले आहेत. पक्ष वेगळे असले तरी, विकासकामासाठी एकत्र येऊन नागरिकांचे प्रश्‍न सोडविले जात आहेत. विरोधकांना कामाने उत्तर दिल्यास नागरिकांच्या समोर देखील खरे-खोटे समोर येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


संजय नगर झोपडपट्टीत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. पावसाळ्यात घरासमोरच पाण्याचे साचलेले डबले व चिखलाने माखलेले रस्त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे देखील अवघड होत होते. मात्र या काँक्रिटीकरणाने झोपडपट्टीतील रस्ते आता चकाकणार आहेत. सर्वसामान्यांच्या हाकेला ओ देणारे नगरसेवक म्हणून शिंदे काम करत आहे. जिव्हाळ्याचा पाणी प्रश्‍न, ड्रेनेज लाईन व रस्त्याचा प्रश्‍न देखील सोडविण्यात आल्याने येथील नागरिकांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. नगरसेवक शिंदे यांनी संजय नगर परिसराची पहाणी करुन प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *