• Mon. Dec 1st, 2025

केडगावमध्ये मतदार नोंदणी व आयुष्मान भारत योजनेसाठी नाव नोंदणी अभियानाचे प्रारंभ

ByMirror

Aug 12, 2023

केडगाव भाजपचा उपक्रम

पहिल्या टप्प्यात 600 नवमतदारांची तर 1200 पेक्षा जास्त नागरिकांना आयुष्मान कार्डसाठी नोंदणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- मतदान प्रक्रियेत युवा मतदारांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी व केंद्रीय आयुष्मान भारत योजनेद्वारे आरोग्य सेवेचा लाभ सर्वसामान्य वर्गाला मिळण्यासाठी केडगाव भाजपच्या वतीने प्रभाग क्रमांक 16 मध्ये दुसऱ्या टप्प्यातील ऑनलाईन नाव नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. सुजय अनिल मोहिते यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या या उपक्रमात पहिल्या टप्प्यात 600 नवमतदारांची नोंदणी तर 1200 पेक्षा जास्त नागरिकांना आयुष्मान कार्डसाठी नोंदणी करुन देण्यात आली आहे.


दुसऱ्या टप्प्यातील अभियानाचा प्रारंभ भाजपचे शहराध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते व केडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सुजय मोहिते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचे कार्य करत आहे. सर्वसामान्यांना आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी भाजपच्या माध्यमातून ही योजना घरोघरी पोहचविण्याचे कार्य केले जात आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. आर्थिक परिस्थिती नसलेल्या व्यक्तींना याचा मोठा आधार मिळत आहे. तर नव मतदारांच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याचे कार्य होत आहे. प्रौढ मतदारांसह नव्याने स्थायिक झालेल्या नागरिकांची नोंदणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


भाजपचे शहराध्यक्ष ॲड. अभय आगरकर म्हणाले की, केडगाव येथे मागील काही वर्षापासून लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. व्यवसाय व कामानिमित्त या उपनगर भागात नागरिक राहण्यासाठी आले आहेत. अशा नागरिकांची स्थलांतरित किंवा नवीन मतदारांची नाव नोंदणी करण्यात येत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, राहत्या ठिकाणी त्यांची मतदान यादीत नाव राहण्यासाठी व आयुष्यमान भारत योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळण्यासाठी राबविण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


या अभियानात नव मतदारांना नांव नोंदणीसह ग्रामस्थांना मतदान यादीतून नाव कमी करणे, एकाच मतदार संघात नाव स्थलांतरीत करणे, नाव, वय व पत्ता दुरुस्तीसाठी अर्ज भरुन घेण्यात येत आहे. केशरी व पिवळे रेशन कार्डधारक ज्यांचे नाव यादीत नाही त्यांचे नाव यादीत समाविष्ट करून मोफत कार्ड काढून दिले व कार्ड धारकाच्या कुटुंबाला 5 लाख रुपयाचे वैद्यकीय खर्च सरकारी तसेच निवड केलेल्या खाजगी दवाखान्यात मोफत उपचार मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *