• Mon. Jan 26th, 2026

कर्जुने खारे येथील शेळके पाटील विद्यालयात रंगल्या मैदानी स्पर्धा

ByMirror

Aug 4, 2023

तर हस्ताक्षर, निबंध व चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

स्व.दादापाटील शेळके यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील मुलांचे भवितव्य घडत आहे -अंकुश शेळके

अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुने खारे (ता. नगर) येथील देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. माजी खासदार स्व.दादापाटील शेळके जयंतीनिमित्त रंगलेल्या विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


शाळेच्या मैदानात व्हॉलीबॉल, कबड्डी स्पर्धा रंगली होती. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. तसेच यावेळी संगीत खुर्ची, लिंबू चमचा सारखे मनोरंजनात्मक खेळही घेण्यात आले. मराठी व इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला.


या सर्व स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थचे अध्यक्ष अंकुश रावसाहेब शेळके, सचिव, रावसाहेब पाटील शेळके, सर्व संचालक मंडळ, सोसायटीचे चेअरमन मंजाबापू निमसे, ग्रामपंचायत सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.डी. थोरात, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. रावसाहेब पाटील शेळके यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.


अंकुश शेळके म्हणाले की, स्व.दादापाटील शेळके यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील मुलांचे भवितव्य घडत आहे. शिक्षणाने गावाचा विकास साधण्यासाठी त्यांनी शैक्षणिक संस्थांची निर्मिती करुन दिशा देण्याचे काम केले. त्यांचा आदर्श समोर ठेऊन संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास घडविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


रावसाहेब पाटील शेळके यांनी विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा देऊन जीवनात यश अपयश पचविण्यासाठी मैदानी खेळ खेळला पाहिजे. मैदानावर घडलेला विद्यार्थी जीवनात यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *