• Fri. Mar 14th, 2025

डॉक्टर्स डे निमित्त शहरातील 21 डॉक्टरांचा सन्मान

ByMirror

Jul 1, 2023

लायन्स मिडटाऊन व होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा उपक्रम

रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन व अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त 21 डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. तर रक्तदान शिबिर घेऊन नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.


सावेडी येथील अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे डॉ. डी.एस. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. दिपाली अनभुले, लायन्स मिडटाऊनचे अध्यक्ष प्रसाद मांढरे, सचिव संदिपसिंग चव्हाण, प्राचार्य डॉ. सुनिल पवार, लायन्स मिडटाऊनचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मांढरे, विकास बडे, नंदकुमार राऊत, राजू बागडे, डॉ. दिपाली अनभुले, संपूर्णा सावंत, अ‍ॅड. सुनंदा ताबे, प्रा. स्वाती जाधव, छाया राजपूत, लतिका पवार, जन कल्याण रक्तपेढीचे गजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात डॉ. सुनिल पवार यांनी लायन्स मिडटाऊन व अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सातत्याने विविध मोफत शिबिराचे आयोजन करुन समाजातील वंचित व गरजूंना आधार देत आहे. सेवाभाव याच उद्देशाने कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. दिपाली अनभुले यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु असलेल्या जनसेवेची माहिती दिली.


प्रसाद मांढरे म्हणाले की, कोरोना काळात डॉक्टरांनी जीवाची बाजी लावून अनेकांना जीवदान दिले. कोरोना काळात डॉक्टर व हॉस्पिटलचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले. डॉक्टर हा रुग्णांची सेवा करुन त्यांना नवजीवन देणारा देवदूत आहे. याच भावनेने अनेक डॉक्टरांनी कोरोनामध्ये योगदान दिले. या महामारीत लायन्स मिडटाऊन व होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोनाच्या रुग्णांना मोफत सेवा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ. डी.एस. पवार म्हणाले की, आजही अनेक डॉक्टर सेवाभावाने समाजात कार्य करत आहे. डॉक्टरीपेशा सेवाव्रत म्हणून अंगीकारण्याची गरज आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कर्तव्याची जाणीव ठेऊन सामाजिक बांधिलकीने हा वसा पुढे चालविण्याचे त्यांनी आवाहन केले.


रक्तदान शिबिरात क्लबच्या सदस्यांसह युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तदानासाठी जन कल्याण रक्तपेढीच्या सहकार्य लाभले. तसेच झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात डॉ. भूषण अनभुले, डॉ. डी.एस. पवार, डॉ. सुनिल पवार, डॉ. शकिल सय्यद, डॉ. राजेंद्र वाकळे, डॉ. मिनल मेहेत्रे, डॉ. विद्या देशमुख, डॉ. कैलास परदेशी, डॉ. राजेंद्र थोरात, डॉ. दिलीप पवार, डॉ. सोनाली वारे, डॉ. नजिमा सय्यद, डॉ. माधुरी मोरे, डॉ. दिपाली अनभुले, डॉ. कल्पना ठुबे, डॉ. वैशाली काकडे या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. तसेच चार्टर्ड अकाऊंटेट डे निमित्त क्लबचे सचिव सीए संदिपसिंग चव्हाण यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली काकडे यांनी केले. आभार संदिपसिंग चव्हाण यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *