• Mon. Dec 1st, 2025

पत्रकारांतर्फे रविवारी ताहाराबादच्या दिंडीचे स्वागत

ByMirror

Jun 17, 2023

वैद्यकीय कीट होणार वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- ताहाराबाद (ता. राहुरी) येथील संत कवी महिपती महाराज यांच्या दिंडीचे रविवारी (18 जून) अहमदनगर शहरात आगमन होत आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून शहरातील सर्व पत्रकारांतर्फे दिंडीचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांनी दिली.


सकाळी अकराच्या सुमारास नगर-मनमाड रोडवर हुंडेकरी शोरूम समोर दिंडीचे स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वारकर्‍यांना उपयुक्त औषधांचे वैद्यकीय कीटचे वाटप करण्यात येणार आहे. निमंत्रित मान्यवर आणि पत्रकारांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी शहरातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारांतर्फे वारकर्‍यांना उपयुक्त औषधांचे कीट वाटप करण्याचा उपक्रम सुरू आहे. या वर्षी संत कवी महिपती महाराज देवस्थानच्या दिंडीत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *