नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व शैक्षणिक साहित्याचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात नवोगत विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तक व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमासाठी प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, माजी मुख्याध्यापक किसन वाबळे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, काशीनाथ पळसकर, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, तुकाराम खळदकर, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, तेजस केदारी, अमोल वाबळे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे आदी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविकात उत्तम कांडेकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत पुढे जाण्यासाठी शाळेच्या माध्यमातून देण्यात येणार्या विविध शैक्षणिक सुविधा व राबविण्यात येणार्या उपक्रमाची माहिती दिली. पै.नाना डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना स्वत:ची परिस्थिती बदलण्यासाठी व देशाच्या भवितव्यासाठी उच्च शिक्षित होण्याची गरज असल्याचे सांगून पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.