विद्यार्थ्यांना दहावी नंतरच्या करियरच्या वाटेवर मार्गदर्शन
बंन्सल क्लासने उत्तम प्रकारे इंजिनियर्स आणि डॉक्टर्स घडवण्याचे कार्य केले -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- बंन्सल क्लासेसच्या वतीने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा माउली सभागृहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना दहावी नंतरच्या करियरच्या वाटेवर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमास शहरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दहावीतील 311 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, डॉ. अमित भराडिया, भाग्योदय विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव बेरड, सतीशचंद्र सुद्रिक, उद्योजक पराजी सातपुते, संभाजी पवार, विशाल पवार, बंन्सल क्लासचे सल्लागार अभय श्रीश्रीमाल, ब्रँच मॅनेजर संजय सूर्यवंशी, दिगंबर मिटकर, सी.ए. यश श्रीश्रीमाल आदींसह दहावीचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, बदलत्या शिक्षण प्रणालीमध्ये बंन्सल क्लासने उत्तम प्रकारे इंजिनियर्स आणि डॉक्टर्स घडवण्याचे कार्य केले आहे. तर शहरासह जिल्हाभरात ज्ञानदानाचे कार्य सुरु असून, विद्यार्थी देखील चांगल्या प्रकारे यश मिळवत आहेत. योग्य मार्गदर्शनाखाली विद्यार्थी त्यांचे ध्येय गाठणार असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात सीए यश श्रीश्रीमाल यांनी बंन्सल क्लासची माहिती दिली. प्राध्यापक बालाजी जाधव यांनी दहावीनंतर काय? व पुढील भवितव्यासाठी शैक्षणिक वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जे. प्रसन्ना यांनी केले.
