राजाभाऊ कोठारी महाराज यांच्या हस्ते चादर अर्पण
धार्मिक एकतेचा संदेश देवून शांती, सद्भावना व समृध्दीची प्रार्थना
नगर (प्रतिनिधी)- सावेडी, हडको येथील हाजी हमीद रहेमतुल्ला दर्गाचा 400 वा संदल उरुस उत्साहात साजरा करण्यात आला. संदल उरुस निमित्त दर्गात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी सर्व धर्मिय भाविकांनी गर्दी केली होती.
दर्गाच्या मजारवर राजाभाऊ कोठारी महाराज यांच्या हस्ते चादर अर्पण करून शांती, सद्भावना व समृध्दीची प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी साबीर अली सय्यद, दीप चव्हाण, दादाभाऊ कळमकर, विजय औटी, नागपूर येथील सेवानिवृत्त सेल्स टॅक्स कमिशनर वर्मा, जितेंद्र निखारे, अमित खामकर, राहुल जाधव, काका शेळके, मनिष सर, रवी बोरा, सिध्दार्थ आंधळे, रितेश महेश मध्यान, संजय घुले, गालीब अली सय्यद, जैद अली सय्यद, निसार अली सय्यद, मोहंमद अली सय्यद, रहेबर अली सय्यद, रजा सय्यद, बिलाल सय्यद, शहा सय्यद, योगेश सोनवणे, बाबू मध्यान, महिंद्र तिवारी, मौलाना रईस, ॲड. प्रज्ञा तळेकर, ॲड. विशाखा पाटील, आसिफ अली, नदीम अली, अकबर अली, मेहंदी सय्यद आदींसह भाविक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
राजाभाऊ कोठारी म्हणाले की, सर्वांना बरोबर घेऊन इस्लाम धर्माच्या शिकवणीप्रमाणे या दर्गाचा संदल उरुस पार पडत आहे. भारतात विविध जाती धर्म एकमेकांचा सन्मान राखून आनंदी जीवन जगत आहे. रंग, रुप वेगवेगळे असले, तरी एकाच ईश्वराची सर्व भक्ती करत असल्याचे त्यांनी सांगितले. तर धार्मिक एकतेने साजरा होणाऱ्या या दर्गाच्या संदल-उरुसचे त्यांनी कौतुक केले.
साबीर अली सय्यद यांनी दरवर्षी हाजी हमीद रहेमतुल्ला दर्गाचा संदल उरुस धार्मिक एकतेचा संदेश देऊन साजरा होत असतो. माणुसकी हीच ईस्लाम धर्माची शिकवण असून, सर्व मुस्लिम बांधव इतर धर्माचा मान-सन्मान राखून बंधू भावाने राहत आहे. सुफी-संतांची परंपरा असलेल्या आपल्या मातीने संपूर्ण देशाला एकात्मतेची शिकवण दिलेली आहे. हाच वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. दर्गाला संदल व चादर अर्पणाच्या कार्यक्रमानंतर भाविकांना लंगरचे वाटप करण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.