• Wed. Feb 5th, 2025

उज्जैन श्री महाकालेश्‍वर मंदिरास नगरच्या आडत व्यापारीकडून 2 किलो चांदीचे मुकुट अर्पण

ByMirror

Feb 1, 2025

नगरच्या भाविकांची उपस्थिती; शहरात साकारण्यात आले शास्त्रोक्त पद्धतीसह उत्तम नक्षीकाम असलेले मुकुट

नगर (प्रतिनिधी)- शहरातील आडत व्यापारी गणेश रामदास लालबागे व मोनिका लालबागे दांम्पत्यांनी उज्जैन येथील श्री महाकालेश्‍वर मंदिरास 2 किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केला. महाकालेश्‍वर मंदिरात विधीवत पुजा करुन लालबागे परिवाराने महाकाल बाबांसाठी चांदीचा मुकुट देण्यात आला आहे. मंदिराचे मुख्य पुजारी गुरू प्रदीप शर्मा यांच्या उपस्थितीत लालबागे परिवाराच्या हस्ते मुकुट व शृंगार आरती पार पडली.


याप्रसंगी वेदांत लालबागे, विहान लालबागे, संतोष कानडे, संदीप कटारिया, संदीप गुजर, विक्रांत कानडे, निकेश गाडळकर, सुरेश लालबागे, विशाल भगत, साई बोरुडे, राजकुमार मुनोत, अशोक गर्जे, महेश कोतकर, राजू शिकरे, लक्ष्मण (आबा) कचरे, प्रकाश भागानगरे, विनय सेहगल, निकेतन नवले, गणराज मेहत्रे, ऋतिक बालवडकर आदींसह शहरातील भाविक उपस्थित होते.
बजरंग काशिनाथ गुरव यांनी महाकालेश्‍वर बाबांच्या मुर्तीसाठी उत्कृष्ट कारीगरी करुन मुकुट साकारले आहे. शास्त्रोक्त पद्धतीने चांदीचा मुकुट बनविण्यात आलेला असून, उत्तम पध्दतीने नक्षीकाम करण्यात आले आहे. लालबागे परिवाराची महाकालेश्‍वर बाबांवर मोठी श्रध्दा असून, या श्रध्देपोटी मुकुट अर्पणाचा स्वप्न साकारले गेले असल्याची भावना गणेश लालबागे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *