केडगावात रंगली बास्केटबॉल स्पर्धा
बॉलर्स व एबीसी संघ विजयी
नगर (प्रतिनिधी)- स्व. बापूराव भाऊराव कोतकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केडगाव येथील देवी मंदिर परिसरात बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने ही स्पर्धा पार पडली. 20 वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या अशा दोन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत शहर व उपनगरातील 13 संघांनी सहभाग नोंदवला.
दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी दमदार खेळी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मुलांच्या गटात बॉलर्स संघाने विजेतेपद पटकावले तर मुलींच्या गटात एबीसी संघ विजयी ठरला.
स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी भूषणजी गुंड, प्रसाद आंधळे, उमेश कोतकर, संतोष कोतकर, विठ्ठल कोतकर, सरोदे, राहुल शिंगवी, किरण गुंड, डॉ. देवेशकुमार बारहाते आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत फ्लेम्स सावेडी, एबीसी वाडिया पार्क, बॉलर्स सारडा महाविद्यालय, कडा, केडगाव स्पोर्ट्स अकॅडमी, आर्मी बॉईज, सीक्रेट हार्ड कॉन्व्हेंट हायस्कूल कोळगाव, अनेक्स नगर यांसह अन्य संघांनी सहभाग घेतला. विजेत्या संघांना माजी सभापती मनोज कोतकर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. स्पर्धेसाठी माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या तर्फे 25 हजार रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. तसेच ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसचे प्रा. जमदाडे सर यांच्या वतीने सर्व खेळाडूंना अल्पोपहार देण्यात आला.
या स्पर्धेप्रसंगी केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीचे छबुराव कोतकर, चंद्रशेखर म्हस्के, मुकुंद काशीद, पियुष लुंकड, ओमसिंग बायस, राष्ट्रीय खेळाडू सचिन अग्रवाल, सत्यन देवळालीकर, हर्षल सेलोत, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब कोतकर, किरण नाट, सुभाष नवले आदी उपस्थित होते. पंच म्हणून विक्टर सर, पिल्ले, आदित्य चव्हाण यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रसाद जमदाडे यांनी केले. आभार स्वाती बारहाते यांनी मानले.