एलिमेंटरी व इंटरमिजिएट रेखाकला परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
आई-वडीलांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट रेखाकला परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अतिवृष्टीमुळे सप्टेंबर 2025 मध्ये होऊ न शकलेली ही परीक्षा नोव्हेंबर 2025 मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
या परीक्षेस बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश मिळवले. अ श्रेणीत 27 विद्यार्थी, ब श्रेणीत 26 विद्यार्थी आणि क श्रेणीत 12 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या विद्या
र्थ्यांना कलाशिक्षक व आर.एस.पी. अधिकारी राज धस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभिनंदनासाठी ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, सचिव बबनराव कातोरे, उपाध्यक्ष शांताराम गाडे पाटील, अभिषेक कळमकर, शाळा समिती अध्यक्ष सुदाम भोर, रावसाहेब सत्रे, प्रकाश शेठ गुगळे यांच्यासह सर्व संस्था पदाधिकारी उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब सातपुते, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
अ श्रेणीतील यशस्वी विद्यार्थी ओम धेंडुळे, आदिती धानुरकर, अनुजा मानमोडे, देवयानी जाधव, हर्षदा विघ्ने, इरा साळुंके, नयन महाजन, सेजल चव्हाण, श्रद्धां ओहोळ, श्रद्धा चिंचोळे, सिद्धेश कुटे, स्वरा कुर्टे, स्वरा जेवे, उदयन काळे आदी. तसेच ब श्रेणीत यश वाकचौरे, सोहम बोरुडे, रामेश्वर घोडके, ऋषिकेश जगताप, संस्कार साळवे, सार्थक जायभाय, श्रावणी ढगे, श्रावणी पवार, श्रेया केदार, अस्मिता उमाप, पायल राठोड, प्रणित अवसरे, प्रसाद पाटील यांनी यश संपादन केले.
महाराष्ट्र शासन आयोजित या परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा आई-वडिलांच्या हस्ते शासकीय प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. गुलाबपुष्प, पेढे भरवून टाळ्यांच्या कडकडाटात हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी कलाशिक्षक व आरएसपी अधिकारी राज धस यांनी कला विषयाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, कला शिक्षणातून विद्यार्थ्यांना भविष्यात विविध करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात. एक ते पाच वर्षांपर्यंत कला विषयातील डिग्री, तसेच ॲनिमेशन, पेंटिंग, कमर्शियल आर्ट, जी.डी. आर्ट, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, टेक्सटाइल डिझायनिंग, ए.टी.डी. आदी अभ्यासक्रमांतून उत्तम प्रगती साधता येते. त्यामुळे कलेची आवड असलेल्या मुलांना पालकांनी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
