मुस्लिम समाजाच्या वतीने वारकर्यांना फराळचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- हुसैन सोशल फाउंडेशनच्या वतीने रेणुका माता देवस्थान नागापूर येथील दिंडीचे करमाळा रोड येथे स्वागत करुन वारकर्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.

आषाढी एकादशीसाठी निघालेल्या दिंडीतील वारकर्यांच्या स्वागतासाठी आलेल्या मुस्लिम समाजबांधवांनी धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविले.
दिंडी मधील ह.भ.प. तुकाराम महाराज कातोरे, शारदाताई, आबा महाराज कातोरे, पंकज महाराज वाकळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लतीफ बेग, विजय बनकर, राजू शेख, अरविंद अरखडे, दिलावर शेख, प्रभाकर तिकटे, मुख्तार शेख, रवी तरटे, रफीक शेख आदी उपस्थित होते. मुस्लिम समाजाच्या वतीने दिंडीचे झालेल्या मनोभावे स्वागताने वारकरी देखील भारावले. तर या अनोख्या कार्यक्रमाने उपस्थितांना सुखद धक्का दिला.
