भाकपचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो करणार मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील प्रगतिशील, डाव्या, पुरोगामी, लोकशाहीवादी पक्ष व संघटनांच्या वतीने हिडेनबर्ग रिपोर्ट आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने या विषयावर शुक्रवारी (दि.7 एप्रिल) शहरातील सीएसआरडी महाविद्यालयात सायंकाळी 4:30 वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी कुलगुरू डॉ सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉ. डॉ. भालचंद्र कांगो या व्याख्यानात मार्गदर्शन करणार आहेत. हीडेनबर्ग अहवालाने पोलखोल केलेल्या अदानी समुहाने एसबीआय एलआयसी मधील सर्वसामान्य जनतेच्या जमा पुंजीवर नरेंद्र मोदी सरकारच्या मदतीने हजारो कोटी रुपयांचे अर्थसाह्य मिळवून घेऊन देशाची केलेली फसवणूक आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी व अदानी यांच्यातील कथीत संबंधाबाबत व अदानी ग्रुपला हजारो कोटी रुपयांचे बेकायदेशीर अर्थसहाय्यबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांच्यावरील जुने फौजदारी खटले प्रकरण घाईघाईने चौकशीवर घेऊन त्यांना शिक्षा घडवून आणून त्यांची खासदारकी रद्द करणे आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर कॉ. कांगो मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानासाठी सर्व अभ्यासू नागरिक व लोकशाहीवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.