दहावी बोर्डासह स्कॉलरशिप, एनएमएमएस परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश
विद्यार्थी केंद्रित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास -आबासाहेब सोनवणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेचे हिंगणगाव विद्यालय गुणवत्तेसाठी कायमच आघाडीवर असून, विद्यार्थ्यांनी उत्तम अध्यापन व शिस्तने कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवले आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास साधला जात असल्याचे प्रतिपादन सरपंच परिषदेचे राज्य कोअर कमिटी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी केले.
हिंगणगाव (ता. नगर) येथील इयत्ता पाचवी व आठवीच्या स्कॉलरशिप, एनएमएमएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत शाळेच्या गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आबासाहेब सोनवणे बोलत होते.

पुढे सोनवणे म्हणाले की, दहावी बोर्डाच्या परीक्षेत शाळेचा निकाल शंभर टक्के लागून विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवले आहे. तसेच स्कॉलरशिप, एनएमएमएस परीक्षेत विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले.सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयासह गावाचा नावलौकिक वाढविला असल्याचे सांगितले.
स्कॉलरशिप परीक्षा व एनएमएमएस परीक्षेत प्रत्येकी दोन विद्यार्थी, सारथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 15 विद्यार्थी चमकले आहे. शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम- सुशांत अंशाबापू महांडुळे (92.20 टक्के), द्वितीय- श्रावणी रामदास अडसूळ (87.20 टक्के), तृतीय- यश संतोष सोनवणे (85.20 टक्के) आलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थितांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच यावेळी मार्गदर्शक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्योजक तथा हमिदपूरचे सरपंच छबुराव कांडेकर, पोपट ढगे, दत्तात्रय पानसरे, प्रतिभा कांडेकर, शिक्षक हंसराज सुपेकर, मुख्याध्यापक सुनील कर्डिले, श्रीराम काकडे, संतोष रोहकले, शुभांगी नरवडे, वैशाली कलापुरे, गणेश पोकळे, विठ्ठल मोरे, सौरभ भिंगारे, जानुक शिंदे, उद्योजक संजय शिंदे, माजी उपसरपंच मनोजकुमार सोनवणे, अंशाबापू महांडूळे, रामदास अडसुळ, संतोष सोनवणे, नजीर सय्यद, बन्सी दरंदले, दिलीप मोरे, आदिनाथ कांडेकर, किशोर कांडेकर आदींसह पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविकात अशोक निमसे यांनी शाळेच्या गुणवत्तेचा आलेख सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कार्ले यांनी केले. आभार वैभव शिंदे यांनी मानले.