राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपक्रम
हर घर तिरंगाप्रमाणे घराघरात शिक्षण पोहोचण्याची गरज -इंजि. केतन क्षीरसागर
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. गुलमोहर रोड येथे राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात ध्वजारोहण करुन आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम राबविला.

या कार्यक्रमासाठी अरुणोदय हॉस्पिटलचे संचालक डॉ. शशिकांत फाटके, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, मंगेश शिंदे, केतन ढवन, मयूर रोहोकले, आशुतोष पानमाळकर, शिवम कराळे, किरण घुले, अभिजीत खरात, सचिन माने, अंकुश सानप, राजेश अरोरा, निलेश ढवण, किशोर थोरात, सुमित कुलकर्णी, पंकज शेंडगे, थोरात सर, आर्यन नवले, बाबू चत्तर, मंदा घोलप आदी उपस्थित होते.
इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, हर घर तिरंगाप्रमाणे घराघरात शिक्षण पोहोचण्याची गरज आहे. यामुळे समाजाची प्रगती होवून सक्षम भारत घडणार आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. हे स्वातंत्र्य अनेकांच्या त्यागातून मिळालेले असून, याची जाणीव ठेवण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. तर तिरंगा ध्वजाचे महत्त्व सांगून, त्यामधील असलेल्या रंगाच्या प्रतिकात्मक उद्देशाची माहिती दिली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पार्वतीबाई म्हस्के विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. नवीन गणवेशाची भेट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
