ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉप किपर्स संघटनेच्या राज्यव्यापी बैठकित घोषणा
अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉप किपर्स संलग्न अहमदनगर स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मीनाताई कळकुंबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पिंपरी चिंचवड येथे संघटनेचे राष्ट्रीय खजिनदार विजय गुप्ता, विभागीय अध्यक्ष शहाजी लोखंडे, राज्यसचिव म्हमाणे, राज्याध्यक्ष डोळसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकित कळकुंबे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉप किपर्स (पुणे) संलग्न अहमदनगर स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदार संघटनेची मागील कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून, कळकुंबे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे या बैठकित स्पष्ट करण्यात आले.

कळकुंबे स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदार संघटनेचे प्रतिनिधी म्हणून कार्य करताना त्यांनी दुकानदारांच्या न्याय, हक्काच्या प्रश्नांवर आवाज उठविला आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, या नियुक्तीबद्दल कळकुंबे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
