मनपा आयुक्तांना निवेदन
अन्यथा उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील स्टेट बँक चौक, जी.पी.ओ. रोड येथील त्या हॉटेलचे अनाधिकृत अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी रिपाई वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप वाघचौरे, शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, संतोष पाडळे, विजय शिरसाठ, सुशील म्हस्के, मुन्ना भिंगारदिवे, भीम वाघचौरे आदी उपस्थित होते.
स्टेट बँक चौक, जी.पी.ओ. रोड येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत. या भागात फास्टफुड, आईस्क्रिम व प्युअर व्हेजचे हॉटेल चालविणार्याने स्त्याच्या फुटपाथवर पूर्णत: अतिक्रमण केले असून, त्या हॉटेलला कोणत्याही प्रकारची पार्किंग सुविधा नाही. रस्त्यावरच वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. सदर हॉटेल संपूर्ण अनाधिकृत व अतिक्रमित आहे. तरी देखील वर्षानुवर्षी त्या ठिकाणी कारवाई होत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जी.पी.ओ. रोड येथील त्या हॉटेलचे अनाधिकृत अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा महापालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.