ग्रामस्थांचा लाभ घेण्याचे आवाहन
नवरात्रोत्सवानिमित्त डोंगरे संस्था, शुभतेज आयुर्वेद, नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचा संयुक्त उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे सोमवारी (दि.3 ऑक्टोबर) निशुल्क मोफत कान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, शुभतेज आयुर्वेद, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने शिबीर घेण्यात येणार असून, या शिबीरास पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे व ऑडीओलॉजिस्ट शुभम खोसे यांनी केले आहे.
गावातील नवनाथ मंदिरात सकाळी 8 ते दुपारी 12 वाजे दरम्यान हे शिबीर होणार आहे. या शिबीरात बहिरेपना, कमी ऐकूयेणे, आदी कानाच्या व्याधींवर तपासणी केली जाणार आहे. ऑडीओलॉजिस्ट शुभम खोसे व अँक्कुपंचरिस्ट मिलिंद कुमार रुग्णांची तपासणी करुन मार्गदर्शन करणार आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, भरत बोडखे, श्याम जाधव, किरण ठाणगे, प्रतिभा डोंगरे आदी परिश्रम घेत आहे. शिबीरासाठी नाव नोंदणी आवश्यक असून, नाव नोंदणीसाठी पै. नाना डोंगरे 9226735346 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
