अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे सोमवारी सहकार आयुक्त कार्यालया समोर उपोषण
सर्व शाखेत एकाचवेळी वार्षिक कॅश, ताळेबंद व बिले तपासण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेचे चेअरमन व मुख्यकार्यकारी आधिकारी यांनी बँकेत आवाढव्य खर्च टाकण्यासाठी बँकेचा आर्थिक वर्ष मार्च एन्ड लाबवित असल्याचा आरोप करुन, बँकेतील 31 मार्च 2023 या मार्गील आर्थिक वर्षाचे सर्व शाखेतील कॅश, ताळेबंद, बोगस बिले तपासण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी सोमवारी (दि.3 एप्रिल) सहकार आयुक्त पुणे कार्यालया समोर उपोषण करणार आहेत.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेने प्रथेप्रमाणे या वर्षीही दोन दिवस उलटूनही 31 मार्च 2023 रोजी मागील आर्थिक वर्षाचे बँक कॅश, ताळेबंद बंद केले नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. सैनिक बँकेत मुख्यकार्यकारी आधिकारी व चेअरमन अनेक वर्षे बँकेत नियमबाह्य कामकाज करत आहेत. शाखा अधिकारी यांना हाताशी धरत कर्जदाराच्या नावे हजारो रुपये नावे टाकत ती रक्कम वसुली हेडला जमा करायची आणि त्यानंतर बोगस बिले दाखखून रक्कम हडप करायची असा उद्योग गेली अनेक वर्षे राबवला जात आहे. अनेक वेळा तक्रारी केल्यावर सहकार खात्याने लेखापरीक्षणात ही बिले वसूल पात्र असल्याचा ठपका ठेवला असतानाही पुन्हा तोच फंडा याही वर्षी वापरण्यात आला असल्याचे नाशिक विभागीय सहनिबंधक व अहमदनगर उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
पारनेर तालुका सैनिक सह बँकेतील पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा येथील सर्व शाखेत एकाच वेळेत जाऊन 31 मार्चची रोख कॅश तपासण्यात यावी, जानेवारी ते मार्च महिन्यातील बोगस बिले तपासावी व वार्षिक कॅश, ताळेबंद बंद करून शेरे द्यावे, 31 मार्च रोजीचे सर्व शाखेतील कॅश, ताळेबंद बंद विहित वेळेत केले नसल्यास संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.