• Sun. Feb 15th, 2026

सावेडीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत मिस इंडिया उपविजेती मान्या सिंह सहभागी

ByMirror

Sep 10, 2022

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मान्या सिंहचे ढोल वादन

मोरया युवा प्रतिष्ठानची पारंपारिक वाद्यांसह रंगली विसर्जन मिरवणुक

अहमदनगर (प्रतिनिधी)- मिस इंडिया 2020 मध्ये उपविजेती ठरलेली मान्या सिंह सावेडी उपनगरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली. प्रबळ इच्छा शक्ती व आत्मविश्‍वाच्या जोरावर मिस इंडिया उपविजेती झालेली उत्तर प्रदेशची मान्या सिंह मोरया युवा प्रतिष्ठान मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी शहरात आल्या होत्या.

पारंपारिक वेशभुषेत अवतरलेल्या सिंह यांना पाहण्यासाठी नगरकरांनी मोठी गर्दी केली होती. खास महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी व लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी त्यांनी स्वत: कंबरेला ढोल बांधून मिरवणुकीत सहभाग नोंदवला.


प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन मदान यांनी मान्या सिंह यांचे शहराच्या वतीने स्वागत केले. यावेळी अपर्णा मदान, अर्चना मदान, अभिलाषा मदान, स्विटी पंजाबी, मनोज मदान, अनिता गुप्ता, स्मिता अरोरा, राजा नारंग, डॉ. विलास व्यवहारे, प्रदीप पंजाबी, राकेश गुप्ता, हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, सतीश गंभीर, महापालिका पाणी पुरवठा विभागाचे रोहिदास सातपुते, सौ. पोखरकर, गायत्री जोशी, डॉ. सोनल व्यवहारे, अनुराधा खोसे, सरस्वती सावंत, शारदा महाले, सिमा लोणकर, वर्षा घुले, वैशाली टाक, ललित पोटे, अभिनव अंबाडे, सागर सारडा, निलेश असरानी, गोवर्धन, पार्थ खंगाळे, करण वाघमारे, अजय गुप्ता, विवेक गुप्ता, ओम जरे, ऋषी जरे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रारंभी मान्या सिंह यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती व नारळ वाढवून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मोरया युवा प्रतिष्ठानच्या पारंपारिक ढोल पथकाचा निनाद सर्वत्र गुंजला. मागील वर्षी मान्या सिंह शहरात आल्या होत्या.

मात्र कोरोनामुळे साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र या वर्षीच्या उत्साहपुर्ण गणेशोत्सवात सहभागी होण्यासाठी खास त्या शहरात दाखल झाल्या. रिक्षा चालकाची मुलगी ते मिस इंडिया 2020 मध्ये उपविजेती ठरलेली मान्या सिंह अनेक युवतींची आयडॉल असून, ती मॉडलिंग क्षेत्रात कार्य करत आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या वतीने यावर्षी विविध स्पर्धा, सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *