• Mon. Dec 1st, 2025

संपाच्या पार्श्‍वभूमीवर शारीरिक शिक्षक उतरणार रस्त्यावर

ByMirror

Mar 12, 2023

कर्मचारी हितासाठीचा निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी)- 14 मार्च पासून विविध संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सहभागी होत आहे. या संपात सर्व शारीरिक शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी केले आहे.


देशात अनेक राज्यात जुनी पेन्शन योजना लागू असून महाराष्ट्रात ती लागू व्हावी म्हणून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटने सोबत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना बेमुदत संपात सहभागी झाल्या आहेत. जुनी पेंशन योजना, शिक्षक भरती, शाळा संचमान्यता, शाळा अनुदान याबाबत शासन अर्धसत्यच मांडत असून मान्यताप्राप्त शाळा व शिक्षक टिकले तरच सर्वसामान्यांची मुले भविष्यात शिक्षणाच्या प्रवाहात राहू शकतील. संचमान्यतेचे नवीन निकष लागू व्हावे व इतर शिक्षकांप्रमाणे शारीरिक शिक्षकांची नियमित भरती व्हावी या करीता संघटनेने वारंवार प्रयत्न केले पण ते प्रश्‍न प्रलंबित आहेत. राज्यात जुन्या पेन्शन संदर्भात संघटनांची झालेली एकजुट भविष्यात विद्यार्थी हितासाठी शारीरिक शिक्षण व शिक्षण क्षेत्राला न्याय मिळवून देईल त्यामुळे सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.


हा संप यशस्वी करण्यासाठी राजेंद्र कोतकर (अ.नगर), आनंद पवार (धुळे), विश्वनाथ पाटोळे (पुणे), शिवदत्त ढवळे (अमरावती), ज्ञानेश काळे ( सातारा), राजेश जाधव (जळगाव), संजय पाटील (नाशिक), राजेंद्र पवार (सातारा), राजेश कदम (सांगली), विलास घोगरे (पुणे), घनशाम सानप (अ.नगर), लक्ष्मण बेल्लाळे (लातुर), कैलास माने (परभणी), प्रितम टेकाडे (नागपूर), अनिल पाटील (कोल्हापुर), राज्य युवा कार्यकारीणी अध्यक्ष डॉ मयुर ठाकरे (नंदुरबार), दिनेश म्हाडगूत (सिंधुदुर्ग), सचिन पाटील (कोल्हापुर), बी.डी. जाधव (नांदेड), डॉ. जितेंद्र लिंबकर (मुंबई), प्रमोद पाटील (पालघर), अ.नगर- एस.एस. गागरे, बापू होळकर, शिरीष टेकाडे, महेंद्र हिंगे, नंदकुमार शितोळे, अजित वडवकर, तुवर पाटील, नितीन घोलप,राजेंद्र कोहकडे, राजेंद्र शिरसाठ, संदिप घावटे, राघवेंद्र धनलगडे, संजय भुसारी, शिवप्रसाद घोडके, भानुदास तमनर, प्रशांत होन, संजय कंगले, संदिप घावटे, ज्ञानेश्वर रसाळ, पोपट लोंढे, सुभाष नरवडे, सुनिल मंडलिक, सोपान लांडे, अनिल चासकर,बबन लांडगे, बापू गायकवाड, भागवत सर, नितीन निकम, प्रतिक दळे आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *