उपक्रमशील शिक्षक पिंपळे यांचे कार्य आदर्शवत – रा. ह. दरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा मराठा शिक्षण संस्थेतील श्रीराम विद्यालयात ज्ञानदानातून विद्यार्थी घडवताना गेल्या तीस वर्षात विज्ञान विषयाचा शंभर टक्के निकाल लावून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच भौतिक सुविधा, पालक संपर्क, विद्यार्थी हीत डोळ्यासमोर ठेऊन केलेल्या कामगिरीने विद्यालयाच्या नावलौकिकात भर घालणार्या विज्ञान उपक्रमशिल शिक्षक पुरस्काराप्राप्त बाळासाहेब पिंपळे यांचे कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष रा. ह. दरे यांनी केले.
नगर तालुक्यातील श्रीराम विद्यालय राळेगण येथे बाळासाहेब पिंपळे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात दरे बोलत होते. विद्यालयाच्या भौतिक सुविधा अद्ययावत करण्यात व लोकसहभाग मिळवून देण्यात पिंपळे यांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन संस्था विश्वस्त मुकेशदादा मुळे यांनी व्यक्त केले. संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने सन्मानपत्र, गौरव चिन्ह, पोशाख देऊन पिंपळे दांपत्याचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
विद्यालयात झालेल्या समारंभात पिंपळे यांनी संस्थेस व विद्यालयास डिजीटल इंटरॅक्टीव्ह बोर्डसाठी निधी दिला. या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त मुकेशदादा मुळे, राधाकृष्ण आढाव, माजी जिल्हाधिकारी तुकाराम कासार, मुख्याध्यापिका तारका भापकर, सुधीर भापकर, दादाभाऊ चितळकर, बाळासाहेब हराळ, संजय गिरवले, अभिलाष घिगे,दादासाहेब दरेकर, शरद घिगे, संस्था निरीक्षक पांडूरंग गोरे, सरपंच दिपालीताई भापकर, उपसरपंच कल्पना कुलांगे, दत्ता नारळे, रामराव गोरे, रंगनाथ भापकर, विजय पोकळे, आप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाडे, सुरेश बोठे, रावसाहेब साबळे, रेवणनाथ चोभे, भाऊसाहेब रोहकले, मिलींद क्षीरसागर, बबनराव भापकर, बाबासाहेब खराडे, शिक्षक पालक संघ व व्यवस्थापन समिती पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.