• Tue. Jul 1st, 2025

शाहरुख शेख यांना उत्कृष्ट न्यूज व्हिडिओ एडिटर पुरस्कार प्रदान

ByMirror

Jun 10, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- एन टीव्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या वतीने शाहरुख शेख यांना उत्कृष्ट राज्यस्तरीय न्यूज व्हिडिओ एडिटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शहरात नुकतेच एन टीव्हीच्या वृत्तवाहिनीच्या महाराष्ट्रातील प्रतिनिधींचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शेख यांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आमदार निलेश लंके, जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातपुते, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी, माजी सरपंच सुनील कोठारी, संपादक इकबाल शेख, अबरार शेख आदी उपस्थित होते


आमदार संग्राम जगताप यांनी एन टीव्ही न्यूज महाराष्ट्रातील प्रश्‍न अत्यंत तळमळीने मांडत आहे. ग्राउंड रिपोर्ट मधून अनेक घटनांना उजाळा देऊन अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार निलेश लंके यांनी माध्यमातील सर्व प्रतिनिधींना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. शाहरुख शेख मागील दोन वर्षापासून मराठी न्यूज चॅनलसाठी व्हिडिओ एडिटींगचे कार्य करत आहे. एडिटींगमधून बातमीला चांगला स्वरुप देण्याच्या कार्यायाबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते ज्येष्ठ वृत्त छायाचित्रकार राजू शेख यांचे लहान चिरंजीव आहेत.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *