शाळेचे 70 विद्यार्थ्यांनी पटकाविली अ श्रेणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजीएट चित्रकला ग्रेड परीक्षेत अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी यावर्षी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एलिमेंटरी व इंटरमिजीएट मध्ये अ श्रेणीत तब्बल 70 विद्यार्थ्यांनी येण्याचा विक्रमी बहुमान पटकाविला असून, शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी अ श्रेणीत चमकले आहे.
शासकीय चित्रकलेचा नुकताच निकाल लागला असून, एलिमेंटरी मध्ये अ श्रेणीत 53, ब श्रेणीत 49 व क श्रेणीत 169 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर इंटरमिजीएट मध्ये अ श्रेणीत 17, ब श्रेणीत 14 व क श्रेणीत 53 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, विश्वस्त मंडळाच्या सदस्या सुनंदा भालेराव, मुख्याध्यापक उल्हास दुगड, उपमुख्याध्यापिका सुषमा चिटमील, पर्यवेक्षक रावसाहेब बाबर, रविंद्र शिंदे, आशा सातपुते आदी उपस्थित होते.
या यशाबद्दल संस्थेचे सह कार्यवाह गौरव फिरोदिया व संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा यांनी शासकीय चित्रकला परीक्षेत यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना कला शिक्षक राजकुमार बनसोडे, प्रविण साळुंके, विवेक आटपाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
एलिमेंटरी मध्ये अ श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी- साक्षी कराड, आदित्य घोडके, संस्कृती रच्चा, सोहम जेठला, विश्वजीत काकडे, श्रेया ठोंबरे, आयुशा बागवान, वरद दाणे, श्वेता उकांडे, जयेश गुलदगड, शामली मांढरे, प्रणव कोतकर, वीणा रामदिन, ओंकार चिमटे, वेदांत गवांडे, वेदांत पेहरे, राजवर्धन घिगे, नरेंद्र कासार, यशोधन सोनवणे, विधी फिरोदिया, संचिता पवार, दिया कोल्हे, श्रुती साळवे, श्रावणी अस्वर, शरण्या बकाल, अनुपम नजन, मैत्रेय उंडे, जोया शेख, राखी कटारिया, कुनालिका कर्नावट, मैथली सारडा, शर्वरी धर्माधिकारी, गौरवी डेंगळे, श्रेया गोटीपामुल, आदेश गोसके, सिद्धी घाणेकर, राहुल शिरसाठ, शताक्षी कुलकर्णी, साक्षी करंजुले, हर्षवर्धन मुळे, सुरज तरटे, तनुजा भुतकर, शिवानी देवकर, यश देशपांडे, नक्षत्रा शिंदे, सिध्दी देशमुख, सुप्रिया पाटील, रिद्धी खाबीया, सृष्टी जाधव, शर्वरी मांढरे, अक्षदा तोडमल, सृष्टी हिकरे, वैष्णवी गायकवाड.
इंटरमिजीएट मध्ये अ श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी- वैष्णवी तरटे, माधवी गुंड, श्रेयस कांडेकर, निशाद कांबळे, स्वानंदी फंड, ईश्वरी कुलकर्णी, सम्यक उजागरे, उत्कर्षा झेंडे, अंजली कदम, प्राची जाधव, अथर्व कोतकर, निकिता झेंडे, दिशा लोंढे, प्रफुल्ल वारे, मनस्वी कुर्हे, सृष्टी शेटीया, अक्षरा जाधव.
