महाराष्ट्रासह विविध राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती
शिक्षण क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल स्विकारण्याची गरज -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- सनराईज एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, इन्स्पायर अबॅकस अकॅडमीच्या वतीने शहरात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रासह विविध राज्यातील हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
शहरातील सुखकर्ता लॉन्स येथे ऑफलाईन पध्दतीने ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाळभाऊ रक्ताटे व श्रीगोंदा कृषी अधिकारी बलभीम शेळके यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम आमदार संग्राम जगताप व आमदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी माजी नगरसेवक ज्ञानदेव पांडुळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, युवा सेनेचे विक्रम राठोड, बीडचे जिल्हा परिषद सदस्य उद्धव बापू दरेकर, पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, दादासाहेब दरेकर, आशाताई निंबाळकर, अरूणाताई गोयल, चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, संजयजी चोपडा, विकास काळे, स. पो. नि. भास्कर भद्रे, मुख्याध्यापक महादेव भद्रे, केशव मोढवे, रावसाहेब खाकाळ, अशोक चौधरी, डॉ.सुभाष वाळके, प्रकाश पोटे, प्रा. अरविंद शिंदे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविकात दादासाहेब शेळके म्हणाले की, इन्स्पायर अबॅकस अकॅडमी ही शालेय विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय संकल्पनेवर आधारित परिपूर्ण बौद्धिक विकास करणारे केंद्र आहे. गरजू व होतकरू महिलांसाठी अबॅकस व वैदिक गणिताचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. गुणवत्तेच्या जोरावर अकॅडमीच्या देश-विदेशात अनेक ठिकाणी शाखांचा विस्तार केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल स्विकारण्याची गरज बनली आहे. अबॅकसने मुलांचा बौध्दिक विकास होवून मन एकाग्र होते. याचा फायदा त्यांना भविष्यातील वाटचालीत होतो. इन्स्पायर अबॅकसच्या माध्यमातून सक्षम विद्यार्थी घडविण्याचे सुरु असलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार निलेश लंके जीवनातील प्रत्येक क्षण ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत स्वत:ला सिध्द करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. तर स्पर्धेत उतरल्याशिवाय आपल्यातील क्षमता देखील कळत नाही. यासाठी प्रत्येक स्पर्धेत यश मिळविण्यासाठी सातत्य व परिश्रम करण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

देशभरातून सहभागी झालेल्या या स्पर्धेत आरुष मगर, प्रतीक चौधार, रेयांश राठोड, आर्वी पायाळ, मंजीत काटे, तेजस्विनी शिंदे, प्रणित देसाई, सुजल बोराडे, आदित्य सोनवणे, सार्थक पवार, संस्कृती कोळेकर, समृद्धी थोरवे, संस्कार मुळे, केतन पठाडे, श्रेयसी भोसले, हर्षल पवार, धीरज शिंदे, प्रचीता ढगे या विद्यार्थ्यांनी चॅम्पियन ट्रॉफीचे सर्वोत्तम पारितोषिक पटकाविले.
अकॅडमीच्या वतीने शैला देसाई, रुपाली शिंदे, स्मिता मेहेत्रे, वनिता विधाते, वैशाली उल्हे, अश्विनी थोरवे, सुजाता बोठे, मीरा शेळके, कोमल करडूळे या शिक्षिकांना उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले. आभार प्रदीप भद्रे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या संचालिका सत्यशीला भद्रे, अर्चना शेळके व अकॅडमीतील सर्व शिक्षिकांनी परिश्रम घेतले.