विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ उत्साहात
विखे पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून दीन-दुबळ्यांची अविरत रुग्णसेवा सुरु -शालिनीताई विखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- बीएससी, पीबीबीएससी, एमएससी 2022-23 परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून, यामध्ये डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन परिचर्या महाविद्यालयातील 82 विद्यार्थी पदवीधर झाले. या पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी देऊन गौरविण्यात आले. तर नवीन बीएससी व जीएनएम या विद्यार्थ्यांचा शपथ विधी सोहळा पार पडला. यावेळी महाविद्याल अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा संस्थेच्या विश्वस्त शालिनीताई विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदवीदान समारंभाप्रसंगी विश्वस्त अॅड. वसंतराव कापरे, संचालक (मेडिकल) डॉ. अभिजित दिवटे, सचिव डॉ.पी.एम. गायकवाड, सहसंचालक (टेक्निकल) डॉ. सुनिल कल्हापूरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतिश मोरे, मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. सुनिल म्हस्के, फिजिओथेरपी प्राचार्या डॉ. शाम गणविर, प्राचार्या डॉ. प्रतिभा चांदेकर उपस्थित होत्या.
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन वैद्यकीय, परिचर्या महाविद्यालयाची 2005 साली स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी स्थापना केली होती. यामध्ये सर्वात प्रथम या बीएससी व जीएनएम कोर्स सुरु करण्यात आले होते. पुढे जाऊन बीएससी, पीबीबीएससी, एमएससी हे पदवीधर कोर्स सुरु करण्यात आले. जिह्यातील वेगवेगळ्या गावातील विद्यार्थी याठिकाणी प्रवेश घेऊन आपले भवितव्य घडविले. स्व. विखे यांनी या महाविद्यालयात शिक्षणाचे रोवलेल्या बीजाचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. शिक्षणा बरोबर आरोग्य सेवा देण्याचे त्यांचे स्वप्न देखील साकारले गेले आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून दीन-दुबळ्यांची अविरत रुग्णसेवा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा चांदेकर म्हणाल्या की, कोरोनाच्या संकटात अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसेवा पुरविताना डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचारिका यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा दिली. महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जात असून, ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालचा अहवाल वाचन प्रा. अमोल टेमकर यांनी केले या कार्यक्रमात बेस्ट टिचर ऑफ दि इयर प्रा. अमित कडू व प्रा. पल्लवी खराडे यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली कुंजीर व स्टीफन भांबळ यांनी केले. आभार उपप्राचार्या डॉ. योगिता औताडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सलोनी टेलधुने, प्रा.प्रशांत अंबरीत, प्रा.मोहिनी सोनवणे, प्रा. निलेश म्हस्के, प्रा. वर्षा शिंदे, प्रा.पल्लवी खराडे, प्रा. विद्या कुर्हे, प्रा. कविता भोकनळ, प्रा. अमोल शेळके, प्रा.नितीन निर्मळ यांनी परिश्रम घेतले.