अखंड हरीनाम सप्ताहात पाचरणे यांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- आखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. साहेबराव यादवराव पाचारणे यांची नियुक्ती करण्यात आली. चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे झालेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात त्यांचा ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात ह.भ.प. साहेबराव पाचारणे यांनी ह.भ.प. बहिरवाल महाराज यांचा पांडुरंगाची भव्य मुर्ती भेट देऊन सत्कार केला. यावेळी ह.भ.प. स्वप्निल महाराज, ह.भ.प. घोडके महाराज, माजी सभापती प्रविणभाऊ कोकाटे, सरपंच मनोज कोकाटे, उपसरपंच शरद पवार, शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनिल सकट, बाजीराव हजारे, चंदू पवार, अशोकभाऊ कोकाटे, अमोलभाऊ खडके आदींसह गावातील ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ह.भ.प. साहेबराव पाचारणे यांचे जिल्ह्यात सुरु असलेले सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन त्यांची आखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ह.भ.प. पाचारणे यांनी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडविण्यात येणार असून, वारकरी सांप्रदायाच्या विचारांनी सेवा देण्यास प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
