अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची आखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ह.भ.प. साहेबराव पाचारणे यांच्या हस्ते भालसिंग यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट उपस्थित होते.

वाळकी (ता. नगर) येथील विजय भालसिंग यांचे सामाजिक क्षेत्रात कार्य सुरु आहे. भालसिंग एस.टी. बँकेत कार्यरत असून, विविध उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक योगदान देत आहे. तर विविध संघटनेचे पद ते भूषवित आहे. त्यांच्या सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पाचारणे यांनी सांगितले.
विजय भालसिंग यांनी संघटनेच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन समाजातील प्रश्न सोडविण्यास कार्यरत राहणार आहे. वारकरी संप्रदायाच्या विचाराने सामाजिक कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडीबद्दल आखिल विश्व वारकरी परिषदचे प्रदेशाध्यक्ष नितीन सातपुते व इतर राज्य कार्यकारणी मंडळाच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
