सचिवपदी अनिकेत आवारे व खजिनदारपदी सीए रोहित बोरा यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या लायन्स क्लब ऑफ प्राईडची 2023-24 साठीची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. लायन्स प्राईडच्या अध्यक्षपदी रवी तुमनपेल्ली यांची तर सचिवपदी अनिकेत आवारे व खजिनदारपदी सीए रोहित बोरा यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
लायन्स क्लब ही जागतिक दर्जाची असलेली सेवाभावी संस्था आहे. क्लबचे 210 देशामध्ये 15 लाख सभासदांच्या माध्यामातून सामाजिक कार्य सुरु आहे. लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईडच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. तर शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील विविध उपक्रम व स्पर्धा घेण्यात येतात. क्लबच्या माध्यमातून मेडिकल एड लायब्ररीचे विस्तार, आरोग्य शिबीर, गरजू विद्यार्थ्यांना मदत, रक्तदान शिबिर, दिवाळी मेळा, आर्थिक दुर्बलघटकांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रवाहात आणण्यासाठी वर्षभर कार्य केले जाणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष रवी तुमनपेल्ली यांनी दिली.
रवी तुमनपेल्ली हे सराफ व्यावसायिक असून, ते लायन्सच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे. सचिव आवारे व्यावसायिक तर खजिनदार बोरा हे चार्टर्ड अकाऊंटंट आहे. त्यांचे सातत्याने सामाजिक कार्य सुरु आहे. या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.