देशाच्या विकासात अभियंते तर समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोठे -हरजितसिंह वधवा
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशाच्या विकासात व समाज घडविण्यात अभियंते आणि शिक्षकांचे योगदान मोठे आहे. दोन्ही घटक समाज विकासाचा पाया असून, अभियंते व शिक्षकांवर विकासाची धुरा अवलंबून असल्याचे प्रतिपादन हरजितसिंह वधवा यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने अभियंता व शिक्षक दिनानिमित्त शहरातील अभियंते व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वधवा बोलत होते. या कार्यक्रमात अभियंते प्रशांत मुनोत, वधवा, प्रणिता भंडारी, सुमित लोढा तसेच शिक्षक विजय कुलकर्णी, योगशिक्षिका अंजली कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. लायन्स क्लबच्या अध्यक्षा डॉ. सिमरन वधवा, प्रिया मनोत, झोन चेअर्मेन आनंद बोरा, धनंजय भंडारे, डॉ. दत्तात्रय अंदुरे, डॉ. अमित बडवे, दिलीप कुलकर्णी, नितीन मुनोत आदी उपस्थित होते.
पुढे वधवा म्हणाले की, आजच्या प्रश्नांवर अभियंते व शिक्षकांनी बोलणे आवश्यक आहे. शैक्षणिक धोरण बदलत असले तरी भविष्यातील दृष्टीकोन डोळ्यासमोर अभियंते व शिक्षकांची वाटचाल असणे आवश्यक आहे. भविष्यातील पिढी समोरील आव्हान पेलण्यासाठी दोन्ही घटक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आनंद बोरा यांनी अभीयंते व शिक्षक देशाच्या विकासात देत असलेले योगदान दिशादर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
