लंगर सेवेने उभे केलेले सामाजिक कार्य शहराच्या दृष्टीने भूषणावह -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- घर घर लंगर सेवेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. माणिक विधाते व कार्याध्यक्षपदी अभिजीत खोसे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
तारकपूर येथील लंगर सेवेच्या अन्न छत्रालयात झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, सतीश गंभीर, मनोज मदान, गुलशन कंत्रोड, राजेंद्र कंत्रोड, अनिश आहुजा, जतीन आहुजा, राजू जग्गी, राजा नारंग, कैलाश नवलानी, इंजि. केतन क्षीरसागर, दलजितसिंह वधवा, सोमनाथ चिंतामणी, प्रशांत मुनोत, बाबू नवलानी आदी उपस्थित होते.
जनक आहुजा म्हणाले की, लंगर सेवेच्या सेवा कार्यात आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे कार्य देखील सामाजिक भावनेने सुरु असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हरजितसिंह वधवा म्हणाले की, शहरात राष्ट्रवादीचे उत्तमपणे कार्य सुरु आहे. पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी सामाजिक भावनेने योगदान देत आहे. नूतन पदाधिकारी यांची झालेली फेरनिवड ही त्यांनी केलेल्या उत्तम कार्याची पावती आहे. त्यांच्या हातून समाजसेवा घडण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी श्री विशाल गणपती ट्रस्टचे विश्वस्त ज्ञानेश्वर रासकर यांचा देखील सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना प्रा. माणिक विधाते यांनी घर घर लंगर सेवेने उभे केलेले सामाजिक कार्य शहराच्या दृष्टीने भूषणावह आहे. या सामाजिक कार्याची जागतिक पातळीवर नोंद झाली आहे. कोरोना काळापासून निस्वार्थ भावनेने सुरु असलेले लंगर सेवेचे कार्य दिशादर्शक असून, येथे झालेला सत्कार हा कामाला प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.