• Thu. Jan 29th, 2026

राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त रंगल्या हस्ताक्षर, निबंध व चित्रकला स्पर्धा

ByMirror

Jan 24, 2023

शालेय विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त सहभाग

स्पर्धेतून युवकांमध्ये जिद्द व एकाग्रता निर्माण होते -आरती शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धेतून युवकांमध्ये जिद्द, एकाग्रता निर्माण होवून मेंदूला चालना मिळते. स्पर्धेमधून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. त्यामुळे युवकांनी विविध स्पर्धेत उतरुन संधीचे सोने करावे. आवड असलेल्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊन जिद्दीने उतरल्यास यश निश्‍चित मिळणार असल्याचे प्रतिपादन उडान फाउंडेशनच्या अध्यक्ष आरती शिंदे यांनी केले.


नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय व उडान फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त शहरातील स्वामी विवेकानंद वसतीगृहात हस्ताक्षर, निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक बाबासाहेब पोटे, वसतीगृहाचे मारुती तोरडमल, शिक्षक बाबासाहेब पालवे, श्यामसुंदर नाणेकर, भाऊसाहेब साबळे, राजू मोहिते, रामदास मोहिते, अ‍ॅड. महेश शिंदे, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.


अ‍ॅड. महेश शिंदे यांनी किशोरवयातील युवावर्गाला योग्य दिशा देऊन, समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले पाहिजे. युवा वर्गाची ऊर्जा सकारात्मक कामाकडे वळविणे आवश्यक आहे. खेळाडू वृत्तीने स्पर्धेत उतरून यश-अपयश पचविल्यास तो व्यक्ती भविष्यातील संकटांना न डगमगता सामोरे जातो, असे त्यांनी सांगितले.


या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, ज्ञानेश्‍वर खुरांगे, जिल्हा युवा समन्वयक शिवाजीराव खरात, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे आदींचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अक्षय शिंदे, अश्‍विनी वाघ, जयश्री शिंदे, भारती शिंदे, कल्पना बनसोडे, कावेरी कैदके, सुवर्णा कैदके आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *