• Thu. Jan 29th, 2026

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत शहरातील विद्यार्थ्यांचे यश

ByMirror

Jan 12, 2023

सर्वेश शिंदे द्वितीय तर रुद्र पटेल तृतीय

अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत शहरातील विद्यार्थी सर्वेश शिंदे (झेड श्रेणी) याने द्वितीय व रुद्र पटेल (अ श्रेणीत) याने तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेमध्ये देशातील अनेक राज्यातून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.


नुकतीच ही अबॅकस स्पर्धा पुणे येथे पार पडली. सर्वेश व रुद्र दोन्ही ग्रेड प्लस अकॅडमीचे विद्यार्थी आहे. या स्पर्धेत अकॅडमीच्या इतर विद्यार्थ्यांनी देखील यश मिळवले असून, या गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

या विद्यार्थ्यांनी अवघ्या 5 मिनिटाच्या आत 100 अवघड गणिते सोडवली. विद्यार्थ्यांना प्रतीक शेकटकर, शाहीन शेख आणि मंजुश्री फल्ले यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *