कौटुंबिक वाद व कलह समोपचाराने सोडविण्याबाबत करणार मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त दि.3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आमंत्रण भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे-देशमुख यांना देण्यात आले. यावेळी काव्य संमेलनाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा कवी सुभाष सोनवणे, कवी आनंदा साळवे, गिताराम नरवडे आदी उपस्थित होते.
नवोदित कवी व नामवंत कवींचे काव्य संमेलन नगर-कल्याण रोड, बायपास चौक (नेप्ती) येथील अमरज्योत लॉन मध्ये रंगणार आहे. या काव्य संमेलनात पल्लवी उंबरहंडे-देशमुख उपस्थित महिलांना कौटुंबिक वाद व कलह समोपचाराने सोडविण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे आमंत्रणप्रसंगी देशमुख यांना पुस्तकांची भेट देण्यात आली.
