लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईडचा, लायन्स व लिओ क्लब अहमदनगरचे उपक्रम
प्रथम विजेत्यासह सायकलचे बक्षिस
अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईड, लायन्स आणि लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.2 ऑक्टोबर) कलर्स ऑफ प्राईड चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथील मोनेकला मंदिरात सकाळी 9 ते 11:30 या वेळेत सदर स्पर्धा होणार असून, या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन क्लबचे अध्यक्ष अभिजीत भळगट, अध्यक्षा डॉ. सिमरनकौर वधवा व हरमनकौर वधवा यांनी केले आहे.
ही चित्रकला स्पर्धा तीन गटात होणार आहे. पहिला गट वय वर्षे 4 ते 7, दुसरा गट वय वर्षे 8 ते 11 व तीसरा गट वय वर्षे 12 ते 15 राहणार आहे. या गटांना अनुक्रमे रंगसंगती, स्वच्छ भारत आणि जागतिक शांतता हा विषय देण्यात आला आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास सायकलचे बक्षिस देण्यात येणार असून, इतर विजेत्यांना विविध आकर्षक बक्षिस ठेवण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या बक्षिसांसाठी मुख्य प्रायोजक मालपाणी ग्रुप असून, स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुनिल साठे, प्रविण गुलाटी, आनंद बोरा, सनी वधवा, प्रणिता भंडारी, अणाया बोरा, मनयोगसिंग माखिजा, प्रिया मूनोत, प्रिशा बजाज, रिध्दी धुप्पड, सुनील छाजेड, आंचाल कंत्रोड यांचे सहकार्य लाभत आहे. स्पर्धेसाठी छायाताई फिरोदिया यांनी शाळेची जागा उपलब्ध करुन दिली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 9970423334, 7522999922 व 9960695115 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

