नेहरु युवा केंद्र, प्रगती फाउंडेशन, जय युवा अकॅडमी व उडान फाउंडेशनचा उपक्रम
बचत गटामुळे महिलांच्या जीवनात विकासात्मक क्रांती घडली -अॅड. महेश शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- बचत गटामुळे महिलांच्या जीवनात विकासात्मक क्रांती घडली. पूर्वी महिलांचे स्थान चुल आणि मुल एवढेच मर्यादित होते. मात्र महिलांना सक्षम बनविण्यासाठी बचत गटाची भूमिका महत्त्वाची ठरली. महिलांनी उंबरठा ओलांडून स्वत:चे व्यवसाय बचत गटाच्या माध्यमातून उभे केले. गरजू कुटुंबाला सावकारी कर्जाच्या पाशातून बाहेर पडण्यासाठी बचतगट चळवळ क्रांतिकारक ठरली. महिलांनी सामूहिकपणे एकत्र येऊन कुटुंबाच्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बचतगट एक प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष अॅड. महेश शिंदे यांनी केले.

नेहरु युवा केंद्र, प्रगती फाउंडेशन, जय युवा अकॅडमी, उडान फाउंडेशनच्या वतीने सावेडी, महावीरनगर येथील बटरफ्लाय नर्सरी स्कूलच्या सभागृहात बचत गटाची माहिती व त्याचे फायदे सांगण्याच्या उद्देशाने महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी अॅड. शिंदे बोलत होते. याप्रसंगी फाउंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी वाघ, आनंद वाघ, उडानच्या आरती शिंदे, पोपट बनकर, बायडाबाई शिंदे, छावाचे कार्याध्यक्ष रावसाहेब काळे, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.
अश्विनी वाघ म्हणाल्या की, सामाजिक संस्था या बचत गटांना खर्या अर्थाने मार्गदर्शन करून सक्षम करीत आहे. बचत गटातील महिलांना लहान, मोठे उद्योगाचे प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, कच्चामाल, बाजारपेठ, मार्केटिंग, टेलरिंग, ब्युटी पार्लर आदी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. उद्योग-व्यवसायासाठी कर्ज भांडवल उभारणीचे मार्गदर्शन प्रगती फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु आहे. नुसते बचत गट स्थापन करुन कर्ज मिळणे हा उद्देश नसून, महिला आर्थिक आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
आरती शिंदे यांनी स्त्री ही चांगली गृहिणी, उत्तम व्यवस्थापिका, शिक्षिका व काळजी घेणारी व्यक्ती आहे. म्हणून बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे व्यवहारिक ज्ञान वाढते, तर निर्णय क्षमता, नेतृत्व गुण विकसित होतात. यासाठी बचत गटाची स्थापना करुन महिलांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सुनीता पवार, संगीता गायकवाड, रंजना जाधव, तृप्ती सोनवणे, रेखा जाधव, रंजना जाधव, प्रियंका पडोळे, सुनीता बोरुडे, सोनाली आजबे, शशिकला गायकवाड, अर्चना पुंड, ज्योती ढुमणे, नैना भोसले, मीरा बनकर, स्नेहा वाऊत्रे, रत्ना वाऊत्रे, रिकिता गोरे, मेघा कंदलकर, सुवर्णा कांडेकर, प्रिया भांडेकर, दिपाली मारवाडकर, अंकिता पाखरे, वर्षा पाचारणे, वर्षा वाघेला, मनीषा कराळे आदींसह विविध भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी नवीन आठ बचत गटांची स्थापना करण्यात आली. विविध शासकीय योजना, घरी करता येणारे लघुउद्योग आदींची माहिती महिलांना या मेळाव्यात देण्यात आली. बटरफ्लाय नर्सरीच्या बालकांनी प्रारंभी स्वागत गीत सादर केले होते.