मच्छीमाराचा ठेका घतलेल्या पोलीसाने मुलाच्या कामाचे पैसे बुडवून चोरीच्या गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- देऊळगाव (ता. नगर) येथील तलावातील मासे राखण करण्यासाठी कामावर ठेवलेल्या मुलाचे 16 महिन्याचे वेतन न देता, पोलीस असलेल्या त्या ठेकेदाराने पदाचा दुरोपयोग करुन संबंधित मुलाविरोधात दिलेल्या चोरीच्या फिर्यादची चौकशी करुन वेतन व न्याय मिळण्याच्या मागणीसाठी कामगार मुलाची आई अनिता भोसले यांनी सोमवारी (दि.13 मार्च) पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण केले. या उपोषणात संकेत भोसले, शिवराम भोसले, पारधी समाज संघटनेचे राजेंद्र काळे, सचिन भोसले, दिनेश भोसले, राणी भोसले, ताराबाई काळे आदी सहभागी झाले होते.
देऊळगाव (ता. नगर) येथे मोठे तलाव असून, त्यामधील मच्छीमाराचा ठेका शहरातील एका पोलीस कर्मचारीने घेतला होता. त्याने मुलाला तलावातील मासे राखण करण्यासाठी 20 हजार रुपये महिन्याप्रमाणे कामावर ठेवले होते. घराची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मुलाला कामावर ठेवण्याचा सौदा गावातील उपसरपंच यांच्या समक्ष झाला होता. ठेकेदाराने तलावातून सर्व मासे उपसून नेले, शेवटी थोडे राहिल्याने सदर युवकाने 16 महिन्याचे वेतनची मागिणी केली. मात्र त्यांनी पगार न देता खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी दमबाजी केली व पोलिसांचा धाक दाखविला. शेवटी पैसे न देता कामावरून हाकलून दिले व जातीवाचक शिवीगाळ केल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
28 फेब्रुवारी रोजी मुला विरुद्ध नगर तालुका पोलीस स्टेशनला मासे पकडण्याचे जाळे व त्यातील मासे चोरल्याची खोटी फिर्याद देऊन त्याला अडकविण्यात आले आहे. सदर व्यक्ती पोलीस खात्यामध्ये नोकरीला असल्याने गोरगरिब कुटुंबातील युवकाला अडकविण्यात आल्याचा आरोप अनिता भोसले यांनी केला आहे. मुलाने केलेल्या कामाचा मोबदला मिळावा व दिलेल्या खोटी फिर्यादची चौकशी करून कुटुंबीयांना न्याय मिळण्याची मागणी भोसले यांनी केली आहे.