• Tue. Nov 4th, 2025

माळी महासंघाच्या शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

ByMirror

Aug 7, 2023

सरपंच प्रयागाताई लोंढे यांची महिला जिल्हाध्यक्षपदी निवड

एकजुटीने समाजाचा विकास साधण्यासाठी कटिबध्द -प्रयागाताई लोंढे

अहमदनगर (प्रतिनिधी)- माळी महासंघाच्या शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष राम पानमळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


माळी महासंघाचे राष्ट्रीय अधक्ष आविनाश ठाकरे व प्रदेशाध्यक्ष अरूण तिखे यांच्या मार्गदर्शनानुसार सदर नियुक्त्या करण्यात आल्या. शेंडीच्या सरपंच प्रयागाताई लोंढे यांची महिला जिल्हाध्यक्षपदी, राजेंद्र बोरूडे यांची कर्मचारी आघाडी शहराध्यक्षपदी, उद्योजक मनोज फुलसौंदर यांची उद्योजक आघाडीच्या शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे झालेल्या पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, शहर जिल्हाध्यक्ष नितिन डागवाले, कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष नंदकुमार नेमाने, वकील आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. सुनिल महाराज तोडकर, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप दळवी, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, सागर बनकर, ज्ञानेश्‍वर पांढरे, तुषार फुलारी, विवेक फुलसौंदर, गणेश धाडगे, यश भांबरकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


राम पानमळकर म्हणाले की, माळी महासंघाच्या माध्यमातून संपूर्ण समाज एकवटत आहे. समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयत्न सुरु असून, संघटना बांधणी उत्तमपणे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष गणेश बनकर यांनी समाजातील प्रत्येक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना माळी महासंघात कार्य करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. समाज कार्य हे एकमेव उद्दीष्ट ठेऊन सर्वांना जोडले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सरपंच प्रयागाताई लोंढे म्हणाल्या की, राजकीय पक्षाचे जोडे बाजूला करुन माळी महासंघाच्या माध्यमातून सर्व समाज एका विचाराने एकत्र येत आहे. एकजुटीने समाजाचा विकास साधण्यासाठी कटिबध्द राहणार असून, महिलांचे देखील संघटन उभे केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आभार तुषार फुलारी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *