शहर राष्ट्रवादीची महापालिकेकडे मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती कार्यक्रमासाठी महापालिकेच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर होणार्या कार्यक्रमासाठी परिसराची स्वच्छता करुन मंडप व आसन व्यवस्था करण्याची मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनपाचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, ओबीसी सेलचे अमित खामकर, फुले ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दीपक खेडकर, सरचिटणीस मारुती पवार, उमेश धोंडे, गणेश बोरुडे, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, तालुका उपाध्यक्ष लहू कराळे, आशिष भगत आदी उपस्थित होते.
शहरातील माळीवाडा येथील महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी मंगळवार दि. 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती साजरी होणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभिवादन कार्यक्रम होणार आहे. तसेच विविध मान्यवर अभिवादनसाठी या ठिकाणी येत असतात. त्यांच्या सोयीसाठी उन्हाची तीव्रता लक्षात घेता येणार्या समाजबांधवांना थांबण्यासाठी मंडप व आसन व्यवस्था उपलब्ध करुन देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.